अंबाजोगाईत डॉक्टरची आत्महत्या! डॉ. मंदार दाभाडे मृत अवस्थेत सापडले

Rokhthok Maharashtra 19 0

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंबाजोगाई येथे निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मृत डॉक्टरचे नाव डॉ. मंदार दाभाडे असे असून, ते
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ते रोहिदास नगर परिसरातील भाड्याच्या घरात राहत होते. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने संशय आला आणि घटना उघडकीस आली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अजून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. कामाचा ताण, वैयक्तिक कारण की इतर काही? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.