कुर्ला हादरलं! वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार, एक जण गंभीर

Rokhthok Maharashtra 2 0

मुंबईतील कुर्ला परिसरात बुधवारी रात्री अचानक गोळीबार झाला…
हलाव पुलाजवळ ऐन वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली…
बाबा एलप्पा पवार या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या…
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे…
त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे…
घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं…
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली…
या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून
गँगवॉरचा अँगल तपासात समोर येत आहे…
जखमी व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने
हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की टोळीयुद्धाचा भाग आहे, याचा तपास सुरू आहे…
पोलीस लवकरच या प्रकरणाचा उलगडा करतील, अशी माहिती देण्यात आली आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.