बकरीच्या केसांनी उघडलं रहस्य! 10 वर्षांच्या मुलीच्या प्रकरणात मोठा खुलासा

Rokhthok Maharashtra 1 0

एक धक्कादायक गुन्हा… आणि त्यामागचं गूढ उघड करणारा छोटासा पुरावा…

राजधानीत 10 वर्षांच्या मुलीचा मृतदेह कचऱ्याजवळ सापडला…
ती घरातून बाहेर पडली होती, पण परत आली नाही…

पोलिस तपास सुरू झाला आणि लक्ष गेलं त्या ब्लँकेटकडे…
ज्यात मुलीचा मृतदेह गुंडाळलेला होता…

तपासात त्या ब्लँकेटवर बकरीचे केस आढळले…
याच धाग्याने पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले…

एका घराबाहेर बकऱ्या बांधलेल्या दिसल्या…
घराला कुलूप होतं, पण आत आरोपी लपून बसलेला आढळला…

चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला…
वाईट हेतूने मुलीला खोलीत नेल्याचं आणि नंतर तिचा जीव घेतल्याचं समोर आलं…

या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे…
तर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे…

छोटासा पुरावा… आणि गुन्ह्याचा मोठा उलगडा…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.