गुप्तधनासाठी अघोरी पूजा, 6 जण अटकेत 😱

Rokhthok Maharashtra 1 0

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे…
गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजेला आश्रय घेत सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे…
वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारेगाव शिवारात मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला…
गस्तीदरम्यान संशयास्पद वाहन तपासताना पोलिसांना अघोरी पूजेसाठी लागणारं साहित्य सापडलं…
यामध्ये काळ्या बाहुल्या, ताबीज, केस, लिंबू, सुया आणि इतर वस्तूंचा समावेश होता…
चौकशीत आरोपींनी गुप्तधन मिळवण्यासाठी पूजा करत असल्याची कबुली दिली…
या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
महिलांचे फोटो आणि केस आढळल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे…
या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.