12 वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तनाचा प्रयत्न

Rokhthok Maharashtra 1 0

मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे…
ऑनलाईन डिलिव्हरीच्या नावाखाली एका डिलिव्हरी बॉयने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे…

मालाड परिसरात घडलेल्या या घटनेत, एक महिला साडीची डिलिव्हरी घेण्यासाठी घरात नव्हती…
त्या वेळी 12 वर्षांची मुलगी घरात एकटीच होती…

डिलिव्हरी बॉयने सुट्टे पैसे देण्याच्या बहाण्याने तिला खाली बोलावलं…
आणि मोबाईलवर पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या नावाखाली अयोग्य व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला…

मुलगी घाबरून ओरडल्यावर आरोपी तेथून पळून गेला…

घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे…
त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पुढील तपास सुरू आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.