पश्चिम महाराष्ट्राला कोकण जोडणार….१०८ किमी प्रकल्पाचा DPR तयार!

Rokhthok Maharashtra 2 0

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

वैभववाडी ते कोल्हापूर या १०८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाचा डीपीआर म्हणजेच विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अधिक सोपा आणि जलद होणार आहे.

या मार्गावर उपळे, सैतवडे, कळे, भुई कसबा-बावडा, मार्केटयार्ड यांसह एकूण १० स्थानकांचा समावेश असणार आहे.
तसंच, या रेल्वेमार्गावर गाड्या ताशी ११० किलोमीटर वेगाने धावू शकतील.

महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी सुमारे ६८३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
करुळ घाट आणि भुईबावडा घाट टाळण्यासाठी हा मार्ग वळसा घेऊन जाणार असल्यामुळे अंतर थोडं वाढणार आहे.

या रेल्वेमार्गामुळे कोकणात जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून, प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.