पुणे-सोलापूर महामार्गावर अतिक्रमण कारवाई! गरीबांवर कारवाई, पण कलेक्शन करणारे अधिकारी मोकाट?

Rokhthok Maharashtra 19 0

पुणे-सोलापूर महामार्गावर महापालिकेकडून अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई करण्यात आली…
लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाठ टोलनाका नाका दरम्यान रस्त्यावरची अनधिकृत पथारी हटवण्यात आली…
पण… इथेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक मोठा सवाल निर्माण झाला आहे…
गोरगरीब पोटासाठी व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होते…
पण… त्यांच्याकडून दर महिन्याला हजारो रुपयांचे “कलेक्शन” करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?
माहितीनुसार…
सुमारे ५० टेम्पो चालकांकडून महिन्याला ३ हजार रुपये प्रमाणे…
जवळपास दीड लाख रुपयांचे कलेक्शन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे…
आणि हे पैसे कोणाकडे जातात?
कोणाच्या आशीर्वादाने रस्त्यावर हा बाजार भरतो?
वाहतुकीला अडथळा, अपघातांची मालिका…
यासाठी जबाबदार फक्त हे गरीब व्यावसायिक आहेत का?
की त्यांच्या मागे उभे असलेले भ्रष्ट अधिकारी?
हडपसरमधील नागरिक आता थेट मागणी करत आहेत –
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी…
आणि कलेक्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
रोखठोक महाराष्ट्र न्यूजचा हा सवाल –
“कारवाई फक्त गरीबांवरच का…?
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कधी होणार?”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.