भीमाशंकरच्या जंगलतोडीविरोधात हडपसरकरांचा एल्गार! 2 तासांत 1 हजार नागरिकांच्या सह्या; मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

Rokhthok Maharashtra 6 0

भीमाशंकरच्या जंगलतोडीविरोधात हडपसरमध्ये जनआंदोलन! अवघ्या दोन तासांत एक हजारांहून अधिक नागरिकांच्या सह्या!
भीमाशंकर येथील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आता नागरिकांनी एकजूट दाखवण्यास सुरुवात केली आहे.
हडपसरमधील भोसले नगर येथे आज, १ नोव्हेंबर रोजी महा जनहित प्रतिष्ठान आणि नक्षत्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन तासांमध्ये एक हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत सह्या करून भीमाशंकरमधील जंगलतोडीला आपला विरोध दर्शवला.
या मोहिमेच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या सह्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे. भीमाशंकरमधील वृक्षतोड तातडीने थांबवावी आणि निसर्गसंपदेचे संरक्षण करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.