३५ कोटींचं सोनं लुटलं! SBI दरोड्याचा मास्टरमाइंड बडतर्फ PSI? जळगावमध्ये खळबळ

Rokhthok Maharashtra 4 0

महाराष्ट्रात ‘मनी हाईस्ट’ स्टाईल बँक दरोडा! ३५ कोटींचं सोनं अन् साडेबारा लाखांची रोकड लंपास!
जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली!
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या चार हेल्मेटधारी दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. व्यवस्थापक आणि कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवला. विरोध होताच हवेत गोळीबार केला आणि कर्मचाऱ्यांना खुर्चीला बांधून तब्बल १६ लॉकरमधील सोन्याचे दागिने लुटले.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, २७ किलो म्हणजेच सुमारे ३५ कोटी रुपयांचे सोने आणि साडेबारा लाखांची रोकड लुटण्यात आली!
मात्र, ग्रामस्थांनी धाडस दाखवत दरोडेखोरांचा पाठलाग केला आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे या दरोड्याचा कथित मास्टरमाइंड बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, चादरी विकणारे फेरीवाले बनून या टोळीने बँकेची रेकी केल्याचा संशय आहे.
आता प्रश्न असा आहे की, कायद्याचे रक्षण करणारा पोलीस अधिकारीच गुन्हेगारी कटाचा सूत्रधार कसा बनला? आणि या दरोड्यामागे आणखी कोणाचे हात आहेत?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.