पुणे हादरलं! देहुरोडमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे पुन्हा एकदा गोळीबाराने हादरलं आहे…
देहुरोडमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला आहे…

पंडित नेहरू मंगल कार्यालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली…
नऊ राऊंड फायर करण्यात आले, त्यातील एक गोळी थेट डोक्यात लागली…

 

गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं,
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला…

घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून
पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे…

हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही…
पोलीस तपास सुरू आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.