पुण्यात गँगवॉर! तडीपार गुंडाचा पाठलाग करून खून

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे…
गंगानगर परिसरात मध्यरात्री गँगवॉरसारखी घटना घडली…
कुख्यात तडीपार गुंड राणा कांबळे याची हत्या करण्यात आली…
काही हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला…
प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार वर्चस्वाच्या वादातून घडल्याचं समोर येत आहे…

ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त केला जात आहे…
राणा कांबळेवर यापूर्वीही चोरी, मारामारीसारखे अनेक गुन्हे दाखल होते…
तडीपार असतानाही तो परिसरात मोकळेपणाने फिरत होता, हे धक्कादायक आहे…
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे…
तर पोलिसांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत…
CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून
पुढील तपास सुरू आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.