पुण्यात 2.34 कोटींची फसवणूक! बॉटलिंग प्लान्टच्या नावाखाली मोठा घोटाळा

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. बॉटलिंग प्लान्टमध्ये भागीदारी देण्याच्या आमिषाने तब्बल २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी राजेश काबरा आणि रोहित काबरा या दोघांना पोलिसांनी अटक केली असून प्रतीक काबरा हा आरोपी अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद लाहोटी यांना सुरुवातीला छोट्या गुंतवणुकीतून नफा दाखवण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्लान्टसाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
प्लान्टमधून लाखोंचा व्यवसाय होत असतानाही खात्यात फक्त ५ लाख रुपये जमा झाले. उर्वरित रक्कम आरोपींनी स्वतःकडे वळविल्याचे तपासात समोर आले आहे.
हिशोब मागितल्यानंतर टाळाटाळ सुरू झाली आणि अखेर मशीनरीही गायब असल्याचे उघड झाले.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.