बोरखेडीत स्मशानभूमीसाठी उपोषण! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक

Rokhthok Maharashtra 15 0

बोरखेडी गावात स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. राज्य शासनाची ‘स्मशानभूमी’ योजना येथे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं. मात्र, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

https://youtube.com/shorts/mdoRskYf8iw

गावातील कडुजी रामभाऊ आघाव यांनी १० एप्रिलपासून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे.
गावात ई-क्लास आणि गायरान जमीन उपलब्ध असूनही काही लोकांनी त्यावर ताबा मिळवल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे गावासाठी हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
दरम्यान, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता प्रशासन जागं होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.