वसंत मोरे थेट घोड्यावरून PMC मध्ये! मोदींच्या इंधन बचत आवाहनावर अनोखं आंदोलन

Rokhthok Maharashtra 20 0

पुण्यात आज एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी थेट घोड्यावर बसून पुणे महानगरपालिका गाठत सत्ताधाऱ्यांना इंधन बचतीचा संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल बचतीचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.

“इंधन बचतीची सुरुवात आधी सत्ताधाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी करावी. नगरसेवकांनी महापालिकेत गाड्या न आणता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा,” असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.
घोड्यावरून महापालिकेत आलेल्या वसंत मोरेंकडे अधिकारी आणि कर्मचारी पाहतच राहिले. त्यांच्या या हटके आंदोलनाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.