उष्माघात म्हणजे काय? उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल

Rokhthok Maharashtra 18 0

उन्हाळ्यात खूप वेळ उन्हात फिरलात, किंवा AC मधून थेट उन्हात गेलात तर शरीराला उष्माघात होऊ शकतो.
यालाच इंग्रजीत “Sunstroke” असे म्हणतात.
या वेळी शरीराचं तापमान खूप वाढतं आणि घाम येणं थांबतं.
डोके दुखणं, चक्कर येणं, उलट्या होणं, आणि कधी कधी बेशुद्ध होणं हि उष्माघाताची लक्षणे आहेत

चला तर मग जाणून घेऊ …..उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?
नेहमी डोकं झाकून बाहेर पडा, भरपूर पाणी प्या, आणि उपाशीपोटी उन्हात जाऊ नका.
जास्त उन्हात काम करणे टाळा आणि शक्य असेल तेव्हा सावलीत थांबा.
जर कोणाला उष्माघात झाल्यासारखं वाटत असेल तर लगेच त्यांना थंड जागी न्या , पाणी द्या आणि शरीर थंड करा.
जर वेळेत उपचार मिळाले नाही तर…. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.