कचऱ्याच्या डब्यात ६ कोटींचे ड्रग्ज! टिटवाळ्यात मोठा पर्दाफाश

Rokhthok Maharashtra 14 0

क्राईम थ्रिलरला मागे टाकणारी घटना टिटवाळ्यात समोर आली आहे.
एका साध्या बार गर्लच्या घरातून तब्बल ६ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत! 😳
घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेल आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी
महापालिका अधिकारी बनून ही धाडसी कारवाई केली.
सर्वेक्षणाच्या बहाण्याने इमारतीत प्रवेश करत
पोलिसांनी अश्विनी पॉलच्या घरावर छापा टाकला.

सुरुवातीला काहीच सापडले नाही…
पण घराच्या कोपऱ्यातील एका साध्या कचऱ्याच्या डब्याने
संपूर्ण गुपित उघड केलं! 🚨
त्या डब्यातून तब्बल ५ हजार एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आल्या,
ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ६ कोटी रुपये आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला—
अश्विनी पॉल ही रुकसाना शेख या बनावट नावानेही वावरत होती
आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ड्रग्ज रॅकेट चालवत होती.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तिचा लिव्ह-इन पार्टनर अमीर सय्यद असून
पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
👉 आता या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का,
आणि १ कोटींचा निधी कुठून आला, याचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.