कल्याण हादरलं! ३६ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

Rokhthok Maharashtra 2 0

कल्याणजवळील म्हारळ गावात एक धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे.
३६ वर्षीय रवींद्र आहिरे यांनी आपल्या आईला उपचारासाठी दवाखान्यात नेलं आणि सुखरूप घरी आणलं.

मात्र काही वेळातच ते वैयक्तिक कामासाठी घराबाहेर पडले… आणि आधीपासून दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

या भीषण हल्ल्यात रवींद्र आहिरे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.

या हत्येमुळे म्हारळ गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून टिटवाळा पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.