पुण्यात 14 दिवस जमावबंदी लागू; मोर्चे-आंदोलनांवर पूर्ण बंदी

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यात 26 मे ते 8 जून 2026 दरम्यान तब्बल 14 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
या काळात कोणतेही मोर्चे, आंदोलनं, सभा किंवा मिरवणुका काढण्यास पूर्णपणे बंदी असेल.
पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावरही निर्बंध असणार आहेत.
तलवार, काठी, लाठी, बंदूक किंवा इजा करू शकतील अशा वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसंच चिथावणीखोर घोषणा, गाणी किंवा सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतींवरही बंदी असेल.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, इंधन बचतीसाठी पुणे महानगरपालिकेनेही कार पूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि ऑनलाइन बैठकींवर भर देण्याचे आदेश दिले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.