“ड्रग्स थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही?” – अमित ठाकरेंचा थेट सवाल

Rokhthok Maharashtra 1 0

मुंबई आणि नाशिकमधील वाढत्या ड्रग्स प्रकरणांवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
“राज्यात ड्रग्स येतात कुठून?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

“सरकारमध्ये ड्रग्स थांबवण्याची ताकद नाही का? पोलिसांना 24 तास फ्री हँड दिला, तर गुन्हेगार आपोआप नियंत्रणात येतील.”

शाळांच्या परिसरातही ड्रग्स विक्री होत असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
“मी सत्तेत असतो, तर आरोपींना फाशी दिली असती,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

यासोबतच सर्व कंपन्यांचे 100% ऑडिट करण्याची मागणी करत,
“तुमच्या कंपनीत कोण काम करतंय हे माहित असलं पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत,
अमित ठाकरे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.