पत्नीचा पाय कापून पती पोलीस स्टेशनमध्ये! आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

Rokhthok Maharashtra 1 0

Andhra Pradesh मधून एक अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
घरगुती वादातून एका पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा पायच वेगळा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
माहितीनुसार, आरोपीला पत्नीवर अफेअरचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला.
धक्कादायक म्हणजे, हल्ल्यानंतर आरोपी कापलेला पाय हातात घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण आला.
दरम्यान, गंभीर जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर तिचा पाय वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.