पिसोळी ता.हवेली, जि.पुणे येथील महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहत नियमित करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी • वन विभाग आणि महसूल विभाग यांनी योग्य समन्वयाद्वारे कुष्ठरोगग्रस्त नागरिकांना येथे कायमस्वरुपी हक्काची घरे देण्याबाबत उपाययोजना करावी • विधानपरिषदेचे सदस्य आमदार श्री.योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या “औचित्याच्या मुद्या” वरील बैठकीत सभापती प्रा.राम शिंदे यांचे निदेश

Rokhthok Maharashtra 1 0
मुंबई, दिनांक 10 जून, 2025 (प्रतिनिधी / वार्ताहर)
समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय देणे हे सरकारचे धोरण असून त्यानुसार अंतुलेनगर, पिसोळी ता.हवेली, जि.पुणे येथील महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहत नियमित करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. वन विभाग आणि महसूल विभाग यांनी योग्य समन्वयाद्वारे कुष्ठरोगग्रस्त नागरिकांना येथे कायमस्वरुपी हक्काची घरे देण्याबाबत उपाययोजना करावी. गेल्या 20 वर्षापासून हा विषय प्रलंबित रहावा, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता अधिक विलंब न करता आठ दिवसाच्या आत समन्वयाने हा प्रस्ताव सादर केला जावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज दिले. 
https://youtube.com/shorts/WXF_5yaX0N8?feature=share
विधानपरिषदेचे सदस्य आमदार श्री.योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 12 मार्च, 2025 रोजी अंतुलेनगर पिसोळी येथील कुष्ठरोगग्रस्त नागरिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने “औचित्याचा मुद्दा” उपस्थित करुन या विषयाकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात विधान भवन, मुंबई येथे आयोजित या बैठकीत सभापती महोदयांनी वरील निदेश दिले. या बैठकीस विधानपरिषदेचे सदस्य आमदार श्री.योगेश टिळेकर, विधानमंडळाचे सचिव (3) डॉ.विलास आठवले, वन विभागाचे मुख्य वन संरक्षक श्री.एन.आर.प्रवीण (पुणे), वन संरक्षक श्री.मोहिते, तहसीलदार श्री.किरण सुरोवसे, अवर सचिव (महसूल) श्री.संजय जाधव तसेच वसाहत प्रकल्प प्रतिनिधी श्रीमती स्नेहल दगडे, श्रीमती जान्हवी बोरसे उपस्थित होते. सदरहू वसाहत ही वन विभागाच्या जागेवर आहे. 40 टक्के अपंग प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना सरकारी जमीन देण्याचे शासनाचे धोरण आहे.
https://www.youtube.com/watch?v=_2V2QswZOl0
शासनाने सन 2004 मध्ये महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील कुष्ठरोगी वसाहती नियमित केल्या आहेत. याच धर्तीवर ही पिसोळी येथील वसाहत देखील नियमित करुन संबंधितांना न्याय द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य आमदार श्री.योगेश टिळेकर यांनी केली. त्यानुसार महसूल विभागाने आठ दिवसाच्या आत हा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सभापती महोदयांनी दिले.
https://www.youtube.com/watch?v=e5_3TSwqkLY

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.