पुण्यात अनधिकृत दारू विक्रीवर छापा; ₹56 हजारांचा मुद्देमाल जप्त

Rokhthok Maharashtra 1 0

दि.01/05/2026 रोजी महाराष्ट्र दिनामुळे ड्राय डे असल्याने खडक पोलीस स्टेशन तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून रोनक बारच्या खाली, नाईक बिल्डिंग पार्किंगच्या मागे असलेल्या एका खोलीत इसम नामे 1) गणेश सुभाष ठोंबे, वय- 26 वर्षे, धंदा- हॉटेल, पत्ता- तिसरा मजला, पुष्पलता अपार्टमेंट, पवार हॉस्पिटल जवळ, बालाजीनगर, पुणे व 2) आकाश काळुराम ओव्हाळ, वय- 31 वर्षे, धंदा- हॉटेल, पत्ता- सी 305, भ्यासिलो सोसायटी, पिंपळे गुरव, पुणे हे दोघे कोणत्याही परवान्याशिवाय अनधिकृतपणे देशी विदेशी दारू विक्री करिता बाळागून मिळून आले. त्यांच्यावर 18:00 वाजेच्या सुमारास छापा टाकून एकूण 56,795/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 262/26 भा.न्या.सं. कलम 65(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 01, श्री कृषीकेश रावले सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन तपास पथक प्रभारी स.पो.नि. अर्जुन कुदळे, पो.ऊ.नि. महेंद्र कांबळे, पो.ह. हर्षल दुडम, पो.ह. किरण ठवरे, पो.शि. कृष्णा गायकवाड, पो.शि. भाऊसाहेब सोडमिसे, पो.शि. विश्वजित गोरे, पो.शि. विकास पांडोळे, पो.शि. पांडुरंग चंदेल यांनी केली आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.