“पुण्यात धक्कादायक प्रकार! विद्यार्थिनीचा गंभीर निर्णय 😢”

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पीएचडी करणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनीने मानसिक त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं.

ही विद्यार्थिनी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे शिक्षण घेत होती. तिच्या गाइड असलेल्या प्राध्यापकावर गैरवर्तन आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DXEbGjsjDyp/

 

माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने आयुष्य संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये ऑगस्ट २०२५पासून प्राध्यापकांकडून अनैतिक वर्तन, गैरवर्तन आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे.

तसेच, घटनेच्या दोन दिवस आधी संबंधित प्राध्यापकाने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही, अशी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनी गंभीर मानसिक धक्क्यात होती.

दरम्यान, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.