पुण्यात मुलीकडून वडिलांचा खून; दारूच्या त्रासातून टोकाचं पाऊल

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील काशिवाडी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
दारूच्या नशेत सतत त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलीनेच खून केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन दस्तगीर फुलारी वय ७० हे रविवारी रात्री दारू पिऊन घरी आले होते.

त्यानंतर त्यांनी मुलगी दिलशाद फुलारी हिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरात जोरदार वाद झाला.
रागाच्या भरात दिलशाद हिने किचनमधील कांदा कापण्याचा धारदार चाकू उचलला आणि वडिलांच्या छातीत वार केला. गंभीर जखमी झालेल्या जैनुद्दीन फुलारी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खडक पोलिसांनी ४० वर्षीय दिलशाद फुलारी हिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.