पुण्यात सिलेंडर स्फोटाने खळबळ! भर दुपारी आगीचे मोठे लोळ

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील अप्पर डेपो परिसरात भर दुपारी सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली.
अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच परिसरात आगीचे लोळ पसरले.

या स्फोटामुळे जवळ ठेवलेल्या मंडप साहित्याला आग लागली.
आकाशात काळा धूर पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांची एकच पळापळ सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने आणि टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने आजूबाजूच्या दुकानांनाही धोका निर्माण झाला होता.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचे मंडप साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.