पुण्यात LIVE गोळीबार! वारजेतील सलूनमध्ये हल्ला 😱

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. वारजे परिसरातील एका सलूनमध्ये सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी घुसून गोळीबार केला. या घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करताना वापरलेली बंदूकच आरोपीच्या हातात फुटल्याने तोही जखमी झाला आहे.
सध्या या हल्ल्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून, गँगवॉरचा अँगलही तपासला जात आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही घटना चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.