प्रेमसंबंधात अडसर ठरला नवरा? पत्नीने प्रियकरासोबत रचला धक्कादायक कट

Rokhthok Maharashtra 12 0

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याच्या संशयातून एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

पंगडी गावातील गजानन मोरे हे रात्री झोपेत असताना त्यांच्या पत्नी कवडी मोरे हिने प्रियकर विष्णू आत्रामच्या सांगण्यावरून विद्युत वायरच्या सहाय्याने त्यांना शॉक देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

 

या घटनेत गजानन मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कवडी मोरे आणि विष्णू आत्राम या दोघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.