“बारामतीत मोठा ट्विस्ट! काँग्रेसची माघार, जय पवारांची प्रतिक्रिया 😱”

Rokhthok Maharashtra 1 0

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी प्रतिक्रिया देत हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काँग्रेसचे आभारही मानले आहेत.

जय पवार म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा होती आणि हा निर्णय दादांना खरी आदरांजली आहे. सर्व पक्ष एकत्र येत असल्यामुळे आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या निवडणुकीसाठी सुरुवातीला 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार रिंगणात आहेत.

उर्वरित उमेदवारांनाही माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जय पवार यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांत या निवडणुकीत आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.