पुण्यात धक्कादायक घटना! आईनेच मुलाचा जीव घेतल्याचा आरोप

Rokhthok Maharashtra 18 0

पुण्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एका आईनेच आपल्या सहा वर्षांच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे.

कुरुळी गावात राहणारा आवेज शेख हा अवघा सहा वर्षांचा होता.
पोलिस तपासानुसार, आईच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे हा गुन्हा घडल्याचं समोर आलं आहे.

घटनेनंतर आरोपींनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला.
मात्र नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आईला अटक केली असून, तिचा प्रियकर सध्या फरार आहे.
त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.