गुटखा थुंकताना ११ हजार व्होल्टचा झटका? ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

Rokhthok Maharashtra 6 0

गुटखा थुंकताना ११ हजार व्होल्टच्या उच्चदाब विद्युतवाहिनीचा संपर्क आल्याने ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदा येथे समोर आली आहे.
प्रभुलाल गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते गायत्री नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. शुक्रवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ते घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उभे होते. यावेळी गुटखा थुंकताना जवळून जाणाऱ्या उच्चदाब विद्युतवाहिनीमुळे त्यांना विजेचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत ते गंभीररीत्या भाजले आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, घराजवळून जाणाऱ्या उच्चदाब विद्युतवाहिन्यांबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, थुंकीमुळेच विद्युतप्रवाह निर्माण झाला की उच्चदाब वाहिनीमधून विजेचा आर्क तयार झाला, हे अद्याप तांत्रिक तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या घटनेमुळे घरांच्या जवळून जाणाऱ्या उच्चदाब विद्युतवाहिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा विद्युतवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.