बारामती निवडणुकीआधी राष्ट्रवादीत बंड! 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Rokhthok Maharashtra 1 0

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये मोठी बंडखोरी समोर आली आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना सांगलीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्यामुळे तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून हा वाद निर्माण झाला. गटनेते मैनूद्दीन बागवान यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, असा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे सर्व राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे देण्यात आले आहेत.

दरम्यान, जगदाळे यांनीही या प्रकरणात नाराजी व्यक्त करत बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.