भाजप मोर्चात गोंधळ! महिलेचा संताप व्हायरल

Rokhthok Maharashtra 1 0

मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात भाजपच्या मोर्चादरम्यान झालेल्या गोंधळावरून राजकारण तापलं आहे. महिला आरक्षण बिल नामंजूर झाल्यानंतर भाजपने राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आणि नागरिक त्रस्त झाले.

याच दरम्यान एका संतप्त महिलेने मोर्चेकऱ्यांना विरोध करत जोरदार प्रतिक्रिया दिली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “मी बाईट देत असताना त्या आल्या. पोलिसांनी त्यांना समजावलं, पण त्यांनी अयोग्य भाषा वापरली. महिला पोलीसही तिथे आल्या. आम्ही संयम बाळगला आणि पोलिसांना सांगितलं की, त्यांना बोलू द्या.”

महाजन यांनी पुढे सांगितलं की, संबंधित महिलेने बाटली फेकल्याचाही प्रकार घडला. “महिला आरक्षणासाठीच हा मोर्चा होता, यापुढे अशा वेळी अधिक काळजी घेतली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे मोर्चे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.