“महापुरुषांच्या स्मारकांना पोलिस संरक्षण द्यावे – प्रशांत जगताप, सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महापालिका आयुक्तांना निवेदन…

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे (प्रतिनिधी)

विकृत मनोरुग्णांमुळे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होते, समाजात विनाकारण अशांतता निर्माण होते पुणे शहर व उपनगरांमधील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिसांचा बंदोबस्त असावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाली म्हणून समाजात तणाव निर्माण झाल्याच्या, जातीय दंगली झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. दिनांक १३ जून २०२४ रोजी हडपसर येथे एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दगड फेकून मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, परंतू भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना भेटून निवेदन देण्यात आले.

 

शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारके, सामाजिक, राजकीय नेत्यांचे पुतळे अशा ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, सिसिटीव्ही नियंत्रण पोलीस स्टेशनमध्ये असावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावेत अशी मागणी महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.