मोठी बातमी! जूनपासून शाळा ONLINE? मोदींच्या वक्तव्याने पालक चिंतेत!

Rokhthok Maharashtra 1 0

मोठी बातमी! मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा ऑनलाइन होणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामुळे देशभरात चर्चांना उधाण आलं आहे.
इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक तेल संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मोदींनी इंधन बचतीसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिल्यानंतर आता शाळांनीही काही काळ ऑनलाइन किंवा हायब्रीड क्लासेसचा विचार करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.


मोदी म्हणाले, “शाळांच्या बस आणि वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल खर्च होतं. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवता येईल.”
यामुळे जूनपासून पुन्हा कोरोना काळासारखे ऑनलाइन वर्ग सुरू होणार का? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून शाळा बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.