लग्नाहून परतताना भीषण अपघात | व्हॅन ट्रकला धडकली, 5 ठार |

Rokhthok Maharashtra 1 0

लग्नाचा आनंद… पण परतीच्या प्रवासात काळाने घात केला!
पवनी तालुक्यातील अड्याळ गावाजवळ भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी रात्री सुमारे ९:४५ वाजता, लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणारी व्हॅन अचानक अपघातग्रस्त झाली. टायर फुटल्याने व्हॅन अनियंत्रित होऊन समोरच्या १० चाकी ट्रकवर जोरात आदळली.
या भीषण धडकेत व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या अपघातात १७ वर्षीय श्वेता नगरेसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आनंदाच्या क्षणातून थेट दुःखाच्या छायेत गेलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.