लग्नाच्या 10 दिवस आधीच मृत्यू | पत्रिका वाटताना भीषण अपघात, 2 ठार |

Rokhthok Maharashtra 14 0

आनंदाच्या उंबरठ्यावर उभं आयुष्य… आणि एका क्षणात सर्व काही संपलं!
नंदुरबारमध्ये मन हेलावणारी घटना घडली आहे. अवघ्या दहा दिवसांवर लग्न असलेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला.
रोहित भिल हा आपल्या मित्र साजन भिलसोबत नातेवाईकांना लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी दुचाकीवरून जात होता. मात्र, नंदुरबार-धानोरा मार्गावरील लोय फाट्यावर भरधाव झायलो गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त गाडीला आग लावली, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लग्नाचा आनंद… आणि अचानक आलेलं दुःख… संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.