लोणी काळभोर पोलीसांनी महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनिधि- स्वप्निल कदम

लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये सततच काहीना काही घटना घडत असतात अशीच एक घटना लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत घडली आहे.मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी २५ वर्षीय पीडितीने दिलेल्या फिर्यादी वरून सुरज हुलवान याला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकार डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत घडला आहे. पिडीता या आपल्या पती व मुलांसोबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहेत. पिडीता आणी सुरज हुलवान हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सूरज हुलवाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे व मुलांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्या पिडीत महिलेने अखेर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.

महिलेचे पती काही दिवसांपूर्वी कामानिनित्त परराज्यात गेले होते. तेव्हा ती घरी एकट्या असल्याचा व ओळखीचा फायदा घेऊन सुरज हा पिडीतेच्या घरात घुसला. तिचेसह तिच्या मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

त्याच्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी हुलवान याला त्वरित अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौगुले करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.