वसंत मोरेंना मोठी जबाबदारी… पुण्यात राजकीय समीकरण बदलणार?

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड…
उद्धव ठाकरे गटाने वसंत मोरेंना मोठी जबाबदारी दिली आहे…

वसंत मोरे यांची पुणे शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे…
ही घोषणा आज सकाळीच करण्यात आली…

मोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की,
“उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे…”

तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं…
लवकरच ‘जनता दरबार’ घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं…

दरम्यान, पुण्यात संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत…
शिवसेना पुन्हा वेगाने वाढेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे…

पुण्यातील या राजकीय बदलाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.