शेतकरी मुलाचा कमाल! पुष्कर थोरात आयकर अधीक्षकपदी निवड

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शेतकरी कुटुंबातील पुष्कर थोरात यांनी मोठं यश मिळवलं आहे.
Manchar येथील पुष्कर जयसिंग थोरात यांची आयकर विभागात कार्यालयीन अधीक्षक (वर्ग दोन) पदावर निवड झाली आहे.
पुष्कर यांनी Sharadchandra Pawar College of Agriculture येथून बी.एस्सी. कृषी पदवी घेतली, तर खेड येथील विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

यापूर्वी ते मुंबईत टपाल सहाय्यक म्हणून कार्यरत होते. नोकरी सांभाळतच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून हे यश मिळवलं आहे.
त्यांच्या या यशामुळे मंचर परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.