श्री शिवाजी विद्यालय धामणी येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना*अध्यक्षपदी डॉ अशोककुमार पगारिया तर उपाध्यक्षपदी अंकुश भुमकर आणि भगवान वाघ यांची बिनविरोध निवड…..

Rokhthok Maharashtra 2 0

रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व ज्यु कॉलेज धामणी या विद्यालयात विद्यालयाच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यासाठी बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आणि शासन परिपत्रकाप्रमाणे विद्यालयात माजी विद्यार्थी संघांची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सोयी सुविधा करणे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.तसेच विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमात संघांची कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे—
१)अध्यक्ष-मा.श्री डॉ. अशोककुमार नेनसुख पगारीया
२)उपाध्यक्ष-मा श्री अंकुश गुंडाजी भूमकर
३)उपाध्यक्ष-मा श्री भगवानराव रामभाऊ वाघ
४)खजिनदार-मा श्री संदिप निवृत्ती बोऱ्हाडे
५)सदस्य-मा श्री ज्ञानेश्वर नानाभाऊ विधाटे
६)सदस्य-मा श्री रामदास म्हतारबा जाधव
७)सदस्या-मा.सौ.रेश्माताई अजित बोऱ्हाडे
८)सदस्य- मा श्री आदिनाथ माधवराव जाधव
९)सदस्य-मा श्री विलासजी नेनसुख पगारीया
१०)सदस्य- मा श्री शांताराम गेणभाऊ जाधव
११)सदस्य-मा.श्री डॉ.राजेंद्र नामदेव वाकचौरे
१२)सदस्य-मा.श्री देवानंद दत्तात्रय जाधव
१३)सदस्य-मा.श्री श्रीराम बळवंत विधाटे
१४)सदस्य-मा.श्री दादाभाऊ मारुती गाढवे
१५)सदस्य-मा.श्री बाबासाहेब शिवराम बढेकर
१६)सदस्य-मा.श्री मयूर संभाजी सरडे
१७)सदस्य-मा.श्री वामनराव धोंडीबा जाधव
१८)सदस्य-मा.श्री दत्तात्रय धोंडीबा भोजणे
सचिव-मा.श्री प्राचार्य सोमवंशी एम.ई.
कार्यकारणीतील सर्व सदस्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक या सन्मानित केले.तसेच कार्यकारिणीची निवड करण्यात पंचायत समिती आंबेगाव चे माजी सदस्य मा श्री रविंद्रभाऊ करंजखेले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा श्री डॉ.अशोककुमार पगारीया यांनी मार्गदर्शन केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर यांनी या संघांचा उद्देश सांगितला.उपस्थितांचे आभार मा श्री ज्ञानेश्वर विधाटे साहेब यांनी आभार मानले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.