संजय राऊतांचा भाजपावर मोठा आरोप 🔥

Rokhthok Maharashtra 14 0

महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापलं आहे…
आणि आता संजय राऊत यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे!
देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका करत
डिबेटचं आव्हान दिल्यानंतर राऊतांनी जोरदार पलटवार केला.
राऊत म्हणाले…
“कोणतंही महिला आरक्षण विधेयक पाडण्यात आलेलं नाही…
मुख्यमंत्री किती खोटं बोलणार?”
इतकंच नाही…
भाजपामध्येच एक गट मोदींना पदावरून हटवण्याचा विचार करत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.
“हे बिल सत्तेसाठी आणलं गेलं…
महिलांच्या हितासाठी नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
तसेच अमित शाह हे या बिलाचे सूत्रधार असल्याचंही राऊत म्हणाले.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.