ससाणे नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी – स्वच्छता कामगार महिलांचा सन्मान, सुरेखा पुणेकर यांचा लावणी कार्यक्रम

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसर: ससाणे नगर येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 14 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज समिती जवळ दिवसभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिका स्वच्छता कामगार महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे व अध्यक्ष राकेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका वैशालीताई बनकर, नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर, महेश ससाणे, विशाल डावरे, बाळासाहेब हिंगणे, मुकेश सोनवणे, प्रशांत बोगम, सोफियान खान, बाळकृष्ण पवार, दौलत सावंत, विनायक मेटे मामा, शंकर ससाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर, पाहुणे व कार्यकर्त्यांचे स्वागत आयोजक शशिकलाताई वाघमारे व राकेश वाघमारे यांच्या हस्ते संविधानाची प्रतिमा व शाल देऊन करण्यात आले. मोठ्या संख्येने भीमसैनिक व नागरिकांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, दि. 15 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजिका शशिकलाताई वाघमारे व आयोजक अध्यक्ष राकेश दादा वाघमारे यांनी केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.