सिंहगडावर धक्कादायक घटना! तरुणीचा मृतदेह दरीत आढळला

Rokhthok Maharashtra 14 0

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुपखाना बुरुज परिसरातील खोल दरीत 28 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत अवघड आणि धोकादायक परिस्थितीत रॅपलिंगच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.

 

प्राथमिक तपासात ही घटना संशयास्पद असल्याचं समोर येत असून नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सिंहगडावरील सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.