हांडेवाडीत पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर! तरवडे वस्तीत हजारो लिटर पाणी वाया

Rokhthok Maharashtra 11 0

पुण्यातील हांडेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिक आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महंमदवाडी प्रभाग क्रमांक ४१ मधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनच्या समस्याही कायम आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

 

दरम्यान, काळेपडळ पोलीस स्टेशनसमोरील तरवडे वस्ती येथे गेल्या पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी लिकेज झाली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या भागात सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक असतानाही प्रश्न सुटत नसल्याने लोकप्रतिनिधींवरही टीका होत आहे. “टॅक्स वेळेवर घेतला जातो, पण सुविधा मिळत नाहीत,” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.