३०,००० फूट उंचीवर माणुसकीचा सुंदर नमुना

Rokhthok Maharashtra 1 0

३०,००० फूट उंचीवर एक सुंदर माणुसकीचा प्रसंग घडला आणि २०० प्रवाशांची मनं जिंकली गेली. सोलहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानात एक आई आपल्या ४ महिन्यांच्या बाळासोबत प्रवास करत होती.

लांबचा १० तासांचा प्रवास… आणि लहान बाळ… त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होईल का, याची तिला आधीच चिंता होती.

म्हणूनच, विमान उडण्यापूर्वीच तिने सगळ्या प्रवाशांना छोटी ‘गुडी बॅग’ दिली. त्या बॅगमध्ये कँडी, इअरप्लग्स आणि एक गोड चिठ्ठी होती.

 

त्या चिठ्ठीत बाळाच्या नावाने लिहिलं होतं – “मी ४ महिन्यांचा आहे, पहिल्यांदाच प्रवास करतोय… जर मी रडलो, तर मला माफ करा.”

विशेष म्हणजे, कोणी तक्रार केली नव्हती… पण त्या आईने आधीच सगळ्यांचा विचार केला.

तिच्या या छोट्या पण मनापासून केलेल्या कृतीने संपूर्ण विमानात सकारात्मक वातावरण तयार झालं.

आज सोशल मीडियावर तिचं भरभरून कौतुक होतंय. कारण कधी कधी मोठेपणा मोठ्या गोष्टीत नसतो… तर अशा छोट्या विचारांमध्ये असतो

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.