12 वर्षांनी उघड झाला रील स्टारचा काळा चेहरा | ठाण्यातील थरारक मर्डर मिस्ट्री उलगडली

Rokhthok Maharashtra 16 0

“१२ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण… आणि आता समोर आलं थरारक सत्य!
ठाणे गुन्हे शाखेने एका जुन्या मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा केला आहे.
२०१४ मध्ये डोंबिवलीतील करण बागुल अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबाला वाटत होतं तो परत येईल… पण प्रत्यक्षात त्याची निर्घृण हत्या झाली होती.
जमिनीच्या वादातून आरोपी सुरेंद्र पाटीलने कार्यालयात लोखंडी सळीने करणवर जीवघेणा हल्ला केला आणि मृतदेह बारवी धरणाजवळील जंगलात फेकून दिला.
धक्कादायक म्हणजे… हा आरोपी सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून प्रसिद्ध होता!
१२ वर्षांनी गुप्त माहिती, डीएनए पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
रिल्सच्या पडद्यामागचा खरा चेहरा आता महाराष्ट्रासमोर आला आहे!”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.