पुणे

सोमवारी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा होणार- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

सोमवारी राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा होणार- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे- भारत निवडणूक आयोगाने सोमवारी दि.२५ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र.२, सी विंग, पुणे येथे दि. २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वा करण्यात आले
असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
पुणे जिल्हयातील २१ विधानसभा मतदार संघस्तरावर व सर्व मतदान केंद्रांवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोविड- १९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करताना जास्तीत जास्त डिजीटल माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, कोविड- १९ च्या सर्व नियमांचे पालन करुन राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमासाठी आयोगाने (Making our Voters Empowered, Vigilant, Safe and Informed) ‘सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक बनविण्यासाठी कटिबध्द’ हा विषय (Theme) घोषित केला असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी सांगितले.
११ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या विषयाच्या अनुषंगाने महिला, युवक, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सेना दलातील मतदार, अनिवासी भारतीय, तसेच समाजातील दुर्लक्षीत घटक यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
यावेळी नवतरुण मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मतदार ओळखपत्राचे व बॅचेसचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक कामकाजामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी, सुपरवायजर, निवडणूक नायब तहलिदार व महसूल सहाय्यक यांना प्रमाणपत्र, मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने विविध स्तरांतील विभागांना सहभागी करुन घेण्यात आलेले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास, पुणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा क्रिडा अधिकारी, शिक्षण संचालक (माध्यमिक), जिल्हा परिषद , पुणे यांच्या स्तरावरुन त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी, महिला, नव युवक, दिव्यांग इ., साठी विविध ऑनलाईन स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात येणार असून त्याद्वारे निवडणूक विषयक व्यापक जनजागरुकता करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी मतदान ओळखपत्र सुलभरित्या प्राप्त होण्याच्या दृष्टीने e EPIC card Hua digital’ आणि ‘click par EPIC’ ही मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात दि. २५ जानेवारी २१ ते दि. ३१ जानेवारी २१ या कालावधीत दि. १ जानेवारी २१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार म्हणून नोंदणी केलेल्या व दि.१५ जानेवारी २१ रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट झालेल्या नवमतदारांना e-EPIC डाऊनलोड करुन घेता येणार आहे. तसेच, दुसन्या टप्प्यात १ फेब्रुवारी २१ पासून मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व मतदारांना e-EPIC डाऊनलोड करुन घेता येणार आहे.
यासाठी मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या http://nvsp.in https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळांचा किंवा Voter Helpline Mobile app (Android/iOS) चा वापर करुन e-EPIC डाऊनलोड करुन घेता येणार आहे. याबाबतच्या सर्व मागदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x