– वडाची वाडी गावाच्या विद्यमान सरपंच सौ कांचन संदीप बांदल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी दि. 07/05/2021 रोजी निवडणूक अधिकारी श्री चिरमुल्ला साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली सदर निवडणुकीत सरपंच पदासाठी सौ राधिका धनवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री संदीपदादा बांदल, मा. उपसरपंच नवनाथसेठ लोखंडे, मा. उपसरपंच दत्तोबा बांदल, वडाची वाडी विविध कार्यकारी सोसायटी व्हा.चेअरमन गोरख बांदल, महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब लोखंडे तसेच मा. सरपंच दत्तात्रय नानासाहेब बांदल यांनी विशेष प्रयत्न केले. सदर प्रसंगी मा.सरपंच तथा विद्यमान सदस्य सौ कांचन संदीप बांदल, उपसरपंच प्रेम गोरख बांदल, ग्रामपंचायत सदस्य सौ उर्मिला गणेश घुले, सौ स्मिता नंदू बांदल, मा.उपसरपंच तथा विद्यमान सदस्य महेश बांदल तसेच पंचायत समितीचे उपसभापती श्री सचिन घुले, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती अण्णा बांदल, मा.सरपंच लक्ष्मण बांदल, बबन बांदल, मा. उपसरपंच जिजाबा बांदल, शिवाजी धनवडे, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत बांदल,उद्योजक गणेश बांदल, सुनिल घुले, सोनल धनवडे, संतोष बांदल, संतोष बावकर,भाऊसाहेब बांदल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंचपदाचा पदभार घेतल्यानंतर सौ राधिका सोमनाथ धनवडे यांनी # गड आला पण सिंह गेला # असे उदगार काढले कारण आपले सासरे कै. तानाजी धनवडे- वडाची वाडी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन यांचे काहीच दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले असल्याने त्याची गावाच्या विकासासाठीची स्वप्नं आपण पूर्ण करू तसेच आपल्या सर्व सदस्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे अश्वासन दिले.
वडाचीवाडी गावाच्या सरपंचपदी सौ राधिका सोमनाथ धनवडे यांची बिनविरोध निवड

131 Comments
Oldest