पुणे

धक्कादायक : महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये एमडी डॉक्टर ने बसविला स्पाय कॅमेरा : पोलिसांनी केला गजाआड, वैदकीय क्षेत्रात खळबळ

पुणे  – Pune Crime |भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका बड्या एमडी डॉक्टरला अटक (Pune Doctor Arrest) केली आहे. त्याने हे छुपे कॅमेरे (Hidden cameras) लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून (amazon) मागवला असल्याचे देखील समोर आले आहे. Pune Crime | MD doctor arrested for installing spy camera in female doctor’s bathroom in Pune

सुजित आबाजीराव जगताप Dr. Sujit Abajirao Jagtap (वय 42) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने (Lady Doctor) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) फिर्याद दिली आहे.
त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलैला घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित जगताप ये एमडी (MD Doctor) आहेत.
त्यांचा हिराबाग (hirabaug pune) येथे मोठा दवाखाना (Hospital) आहे.
ते भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉस्पीटलमध्ये लेक्चर घेण्यासाठी देखील जात होते.
दरम्यान, यातील फिर्यादी एका हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत.
त्या परिसरातील क्वॉर्टरमध्ये एका मैत्रिणीसीबत राहतात. नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर त्या सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रूमवर परत आल्या.
फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर लाईट लावली.
पण, तो बल्ब लागला नाही. बल्ब पाहिला असता तो काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली.
त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharti vidyapeeth police) पोलीस निरीक्षक संगीत यादव (Police Inspector Sangita Yadhav) या तपास करत होत्या.
गेल्या 4 दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तसेच येथील सुरक्षा रक्षक आणि फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्या व्यक्तींकडे चौकशी करत होते.
यादरम्यान एका ठिकाणी जगताप कैद झाले. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली.
आज न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
22 days ago

Unduh hello my website is aiman khan

22 days ago

pertempuran 3d hello my website is cth katasandi1

22 days ago

basket terbuat hello my website is Fa fa-user

22 days ago

pixies hello my website is out there

22 days ago

alcantara leder hello my website is quidditch world

22 days ago

women hello my website is barça anthem

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x