कोल्हापुर

“आ.रोहित पवारांचा फोन, अन हॉस्पिटलचे बिल माफ” – “त्या” कॉलची कोल्हापूर मध्ये चर्चा

कोल्हापूर- कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबानं कुठं जायचं? अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर ओढावलेली महापुराची भीषण परिस्थिती, संकटात सापडलेली जनता आणि त्यांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात पोहोचलेले आमदार रोहित पवार. अशा परस्थिती आ.पवार यांच्या समोर एका मायमाऊलींने आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या उपचार खर्चाची व्यथा मांडली. ही व्यथा मांडताना त्या महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले. ही परस्थिती पाहून आ.रोहित पवार यांनी जागेवरूनच हॉस्पिटलला स्वतः फोन करून मोफत उपचारांची व्यवस्था करून दिली.
राज्यावर आलेल्या कुठल्याही संकटात नागरिकांच्या मदतीसाठी सध्या पुढे दिसून येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे  कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या संवेदनशीलतेची आणि तत्परतेची चुणूक कोल्हापूरकरांना पाहायला मिळाली.
आमदार रोहित पवार कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्यासमोर तिथल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मावशींनी भरल्या डोळ्यांनी ‘कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबानं कुठं जायचं? अशी व्यथा मांडली. आमदार रोहित पवार यांनी लागलीच संबंधित हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना फोन करून तिथल्या तिथे मोफत उपचाराची सोय करून दिली.
या संवेदनशीलतेमुळे आमदार रोहित पवार यांची सर्व सामन्यांच्या समस्या सोडविणाऱ्या सर्वसमावेशक नेत्याची छबी पाहायला मिळाली. समोर उभे राहिलेल्या संकटाची परिस्थिती कितीही बिकट का असेना लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती आणि तातडीने निर्णय घेण्याच्या क्षमतेने अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत करता येते हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे  पूरस्थितीने बाधित असलेल्या एका मावशींच्या डोक्यावरील मोठे आर्थिक संकट दूर झाले. केवळ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीची आश्वासने देऊन लोकांच्या परिस्थितीला हाताळता येत नाही तर तुमची इच्छाशक्ती, संवेदनशीलता, कार्यतत्परता आणि सामाजिक बांधिलकी यातून राजकीय नेतृत्वाची नवी ओळख आणि नागरिकांची नेत्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आमदार रोहित पवारांनी अशा अनेक प्रसंगात दाखवत असलेल्या संवेदनशीलपणा मुळे पुरग्रस्त भागात सध्या चर्चेत आहेत.